9789389834734 Flipbook PDF


66 downloads 121 Views 4MB Size

Recommend Stories


Porque. PDF Created with deskpdf PDF Writer - Trial ::
Porque tu hogar empieza desde adentro. www.avilainteriores.com PDF Created with deskPDF PDF Writer - Trial :: http://www.docudesk.com Avila Interi

EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF
Get Instant Access to eBook Empresas Headhunters Chile PDF at Our Huge Library EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF ==> Download: EMPRESAS HEADHUNTERS CHIL

Story Transcript

लेखक परिचय श्रीराम पवार

प्रसिद्ध राजकीय विश्ले षक व संपादक संचालक, सकाळ माध्यम समहू

श्रीराम पवार हे प्रसिद्ध पत्रकार व राजकीय विश्ले षक असनू , त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील विविध पदांवर 28 वर्षे काम पाहिले आहे. सध्या सकाळ माध्यम समहू ाचे संपादक संचालक म्हणनू ते कार्यरत आहेत. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घटना-घडामोडींचे, तसेच देशभरातील निवडणक ु ांचे दीर्घकाळ अभ्यासपर्ण ू वार्तांकन के ले आहे. राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक क्षेत्रांसह नागरीकरण, पर्यावरण, दहशतवाद आदी विषयांवर ते सातत्याने लेखन करत असनू , शोधपत्रकारिता आणि वि‍श्लेषणात्मक लेखनासाठी ते परिचित आहेत. भारताचे परराष्ट्र धोरण आणि आतं रराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक म्हणनू त्यांची विशेष ओळख असनू , तंत्रज्ञानावर आधारित नवमाध्यमांतील आशयनिर्मिती हा त्यांचा अभ्यासविषय आहे. श्रीराम पवार यांनी ‘मथं न’, ‘जागर’, ‘पॉवर पॉइटं ’, ‘करंट-अडं रकरंट’ इत्यादी वृत्तपत्रीय स्तंभांसाठी के लेले अभ्यासपर्ण ू स्तंभलेखन वाचकप्रिय ठरले आहे. धमु ाळी-‘करंट-अडं रकरंट’, राजपाठ-‘वेध राष्ट्रीय घडामोडींचा’, जगाच्या अगं णात -‘वेध आतं रराष्ट्रीय घडामोडींचा’, ‘मोदीपर्व’, ‘ड्रॅगन उभा दारी’ या राज्य-राष्ट्रीय-आतं रराष्ट्रीय स्तरावरील विविध घटना-घडामोडींचे विश्ले षण करणाऱ्या पसु ्तकांचे लेखन तसेच, ‘संवादक्रांती’ या तंत्रज्ञानावर आधारित नवमाध्यमांतील आशयनिर्मितीवरील पसु ्तकाचे संपादन त्यांनी के ले आहे. अनेक विषयांवरील शास्त्रीय मतचाचण्यांचे संयोजन, निवडणक ू पर्वू आणि मतदानोत्तर मतचाचण्यांत सहभाग आणि विश्ले षण यांचा दीर्घ अनभु व त्यांच्या पाठीशी असनू , पर्यावरण सवर्ध ं नासाठीच्या अनेक उपक्रमांचे आयोजन आणि नेततृ ्व श्रीराम पवार यांनी के ले आहे.

श्रीराम पवार लिखित आंतरराष्ट् रीय घडामोडींवरील विविध परिणाम उलगडू न दाखवणारी संदर्भ पुस्तके

जगाच्या अंगणात वेध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा

ƒƒ जागतिक रचनेत आतं रराष्ट्रीय संबंधांचा दाखवला जाणारा भाग आणि त्यामागचे वास्तव याचा वेध घेण्याचा प्रयत्न या पसु ्तकात करण्यात आला आहे. ƒƒ विविध आतं रराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र धोरण, सत्तासपर्धा आणि त्याचे परिणाम यांचे संदर्भयक्त ु विश्ले षण ƒƒ स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी तसेच अभ्यासक यांच्यासाठी अतिशय सदं र्भयक्त ु पसु ्तक ƒƒ मूल्य : ` १६०

ड्रॅगन उभा दारी

ƒƒ ड्रॅगनरुपी चीनने भारतासमोर निर्माण के लेल्या आव्हानांचा, धोक्याचा वेध या पसु ्तकातनू घेण्यात आला आहे. ƒƒ कोरोनाच्या पार्श्वभमू ीवर चीनची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने महासत्तेच्या दिशेने सरुु असलेल्या आक्रमक,धोकादायक व विस्तारवादी वाटचालीची व जागतिक सत्तास्पर्धेची अभ्यासपर्ण ू माहिती ƒƒ भारत-चीनविषयक महत्त्वपर्ण ू घटना-घडामोडींमागील सत्रु उलगडून तपशील व तत्थ्यांवर आधारीत विश्ले षण आणि भाष्य ƒƒ मूल्य : ` २४०

मोदीपर्व

ƒƒ नरें द्र मोदी यांच्या पतं प्रधान पदाच्या पहिल्या पाच वर्षातील राष्ट्रीय व आतं रराष्ट्रीय कारकिर्दीचे अभ्यासपर्णू विश्ले षण ƒƒ मोदीपर्वातील प्रथम सत्ताकाळाच्या वर्षातील जवळपास सर्वच महत्त्वपर्णू घडामोडींची अभ्यासपर्णू मांडणी ƒƒ मोदीं यांच्या सत्ताकाळातील प्रमख ु निर्णय, राजकीय बदल, आर्थिक, सामाजिक,परराष्ट्र धोरणातील स्थित्यंतरे , बदलती राजकीय परिभाषा यांचा धांडोळा ƒƒ मूल्य : ` ४००

अस्वस्थपर्व

वेध जागतिक घडामोडींचा

श्रीराम पवार

Aswasthparv : Vedh Jagatik Ghadamodincha © Shriram Pawar

अस्वस्थपर्व : वेध जागतिक घडामोडींचा श्रीराम पवार

प्रथम आवृत्ती ः डिसेंबर 2021 मख ु पृष्ठ-मांडणी : प्रदीप खेतमर, आर्ट अॅडव्हर्टायझिगं प्रकाशक ः सकाळ मीडिया प्रा. लि. 595, बधु वार पेठ, पण ु े 411002 मद्रु णस्थळ ः विकास प्रिंटिंग अॅण्ड कॅ रिअर्स प्रा. लि. प्लॉट नं. 32, एमआयडीसी, सातपरू , नाशिक ISBN : 978-93-89834-73-4

संपर्क ः 020-2440 5678 / 88888 49050 [email protected]

© All rights reserved. No part of this publication may be reproduced or transmitted in any form or by any means, electronically or mechanically, including photocopying, recording, broadcasting, podcasting of any information storage or retrieval system without prior permission in writing form the writer or in accordance with the provisions of the Copy Right Act (1956) (as amended). Any person who does any unauthorised act in relation to this publication may be liable to criminal prosecution and civil claims for damages. Disclaimer: The views expressed in this book are those of the Authors and do not necessarily reflect the views of publisher.

माझ्या लेखनाविषयी आस्था आणि कौतक ु असणारे माझे सासरे दिनकरराव पाटील आणि सासबू ाई दिवंगत सौ. आशादेवी दिनकरराव पाटील यांना...

6 | अस्वस्थपर्व : वेध जागतिक घडामोडींचा

मनोगत

जा

गतिक व्यवहाराला आपल्या दैनंदिन जगण्यातही महत्त्व येतं आहे, किंबहुना तसं ते असतंच. जगाच्या पातळीवर होणारे करारमदार थेटपणे आपल्या जगण्यावर परिणाम घडवत असतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखं नेततृ ्व अमेरिके त उदयाला येतं तेव्हा त्यांची धोरण,ं वर्तन व्यवहार जगावर प्रभाव टाकतात; भारतातनू अमेरिके त करियरचं स्वप्न पाहणाऱ्यांवर परिणाम घडवतात. चीन आता जगावर प्रभावाची आपली वेळ आली असं मानू लागतो, त्यासाठी पावलं टाकायला लागतो, तेव्हा एक मोठाच व्यूहात्मक धोका आपल्या दारात उभा राहिलेला असतो. तो केवळ अमेरिका - चीन स्पर्धेपरु ता उरत नाही, तर आपल्या परारष्ट्र धोरणांशी, शत्रुमित्रविवेकाशी जोडला जातो. त्याचे परिणाम पनु ्हा चीनवर अवलंबनू असलेल्या उत्पादन वितरण साखळीवर होतात तेव्हा जागति‍क घडामोडींपासनू फटकून राहता येत नाही. जागतिक व्यवहाराचं आकर्षण वाटणारा आणि जग कवेत घ्यायची आकांक्षा बाळगणारा मोठा वर्ग भारतातही साकारतो आहे. अशावेळी जगाच्या चव्हाट्यावर घडणाऱ्या घटनाघडामोडी त्यामागची सत्रंू उलगडून दाखवणं महत्त्वाचं ठरतं. अनेकदा जागति‍क व्यवहारात जे बोललं जातं, दाखवलं जातं, त्यातनू बरंच काही घडत असतं, त्याचे परिणाम नंतर बऱ्याच काळानं दिसायला लागतात. अमेरिके शी भारताने के लेला अणक ु रार केवळ अणइु धं न परु वठ्यापरु ता किंवा अणभु ट्टी मिळवण्यापरु ता नव्हता, त्यातनू हे दोन देश अनेक आघाड्यांवर एकत्र यायला सरुु वात झाली. व्यापार ते संरक्षण असा व्यापक पट या सहकार्यात येऊ घातला. 'ब्रेक्झि‍ट'वर शिक्कामोर्तब होतं तेव्हा जागतिकीकरणाच्या एका महाप्रकल्पाचा पाया हादरलेला असतो, नव्या रचनेचं सतू ोवाच होऊ लागतं. तेलाच्या दरातील चढउतार आपल्या खिशावर थेट परिणाम घडवतात. मध्यपर्वेू तील तणाव तिथं काम अस्वस्थपर्व : वेध जागतिक घडामोडींचा | 7

करणाऱ्या लाखो भारतीयांमध्ये, त्यांच्या कुटुंबीयांत अस्वस्थता आणू शकतो. जग अधिकाधिक जोडलं जात असताना, एकमेकांवरचं अवलंबन वाढत असताना जागति‍क पातळीवरील व्यवहारांचा परिणाम वाढत राहणं स्वाभाविक आहे. जागति‍कीकरणाच्या वाटचालीत अडथळे येण्याचा, निर्बंधमक्त ु जगाच्या स्वप्नात मिठाचा खडा पडण्याचा काळ असला तरी परस्परावलंबन कायम आहे. जग एकध्रुवी, द्वि‍ध्रुवी किंवा बहुध्रवी याच्या चर्चा होत राहतील; मात्र ते एकमेकांशी जोडलेलं असेल, हे वास्तव संपत नाही. भारताचं जागतिक व्यवहारात सामील होणहं ी वाढतच जाणारं आहे. 1991मध्ये भारताने जागतिकीकरण-उदारीकरण-खासगीकरणाचा मत्रं स्वीकारणारं धोरण अधिकृ तरीत्या साकारलं, त्यावर सरकार कोणाचहं ी आलं तरी पावलं याच धोरणाच्या चौकटीत पडताहेत. ते धोरण देशाला बंदिस्त व्यवस्थेकडून अधिक खलु ्या अर्थव्यवस्थेकडं, म्हणजेच पर्यायानं जगाशी अधिक जोडलं जाण्याकडं घेऊन जाणारं आहे. तीन दशकांनंतर आपण जगाशी अधिक जोडले गेलो हे वास्तव आहे. त्याचाही परिणाम जागतिक घडामोडींविषयी कुतहु ल वाढण्यात होतो. या घडामोडींचं विश्ले षण करण,ं त्या समजावनू सांगणं आणि अभिनि‍वेशापलिकडं जाऊन त्याचे संभाव्य परिणाम तापसणं गरजेचं असतं. 'सकाळ'च्या सप्तरंग परु वणीतील 'करंटं अडं रकरंट' या सदरातनू गेली अनेक वर्षं हेच सत्रू प्रमाण माननू मांडणी करतो आहे. राष्ट्रीय राजकारण आणि आतं रराष्ट्रीय घडामोडींचा वेध यासाठीच हे सदर चालवलं जातं. आतं रराष्ट्रीय घडामोडींवरचं कुतहु ल वाढतं असलं तरी, या विषयावरची चर्चा प्रामखु ्याने आतं रराष्ट्रीय परि‍षदा, घडामोडी, पतं प्रधानांसारख्या नेत्यांचे दौरे , शिखर बैठका, त्यांतील करार-मदार याभोवती फिरणारी असते. मात्र, आतं रराष्ट्रीय घडामोडी आणि राजनय हे पोकळीत साकारणारं प्रकरण नाही; त्याला पार्श्वभमू ी असते आणि भविष्याचा वेधही. यात आपल्या हाती काय लागलं, कुठं कमी पडलो याचा वेध घेणं सजग समहू भान तयार करण्यासाठीही आवश्यक असतं. आपल्याकडं आतं रराष्ट्रीय संबंधांकडंही देशांतर्गत राजकीय स्पर्धेच्या नजेरतनू पाहण्याकडं आणि म्हणनू मग कोण सत्तास्थानी यानसु ार अन्वयार्थ लावण्याकडंही अनेकदा कल दिसतो. इव्हेंटला प्रतिसाद म्हणजे देशांचे संबंध सधु ारले यांसारखे निष्कर्ष काढण्याचा सोस यातनू च येतो. तो वास्तवापासनू तोडणारा असतो. करंट अडं रकरंट या सदरातनू सातत्यानं जागतिक राजकारण ज्या सत्रां ू भोवती साकारतं, 8 | अस्वस्थपर्व : वेध जागतिक घडामोडींचा

त्याच आधारावर काय कमावलं, काय राहिलं याची माडंणी करण्याचा प्रयत्न के ला गेला आहे. तत्कालीन घडामोडींतील दृश्य तपशि‍लांच्या पलीकडं जाऊन संदर्भासह मांडणी करण्याचा प्रयत्न यात झाला. हा प्रयत्न आतं रराष्ट्रीय संबंधांत रुची असणारे अभ्यासक, जाणकार यांच्यासोबतच विद्यार्थी आणि सामान्य वाचकांनाही रुचणारा होता. यातनू च या सदरातील निवडक लेखांचं पसु ्तक करावं अशी सच ू ना अनेक वाचकांनीही के ली. 'अस्वस्थपर्व - वेध जागतिक घडामोडींचा' यामधनू ही कल्पना पर्ण ू त्वास येत आहे. सदरातील लेखांत तत्कालिक संदर्भ असणं स्वाभाविक आहे. तत्कालीन जागतिक आणि देशांतर्गत राजकारणाचे संदर्भही अनिवार्य आहेत. त्याचबरोबर अभ्यासक, जिज्ञास,ू विद्यार्थ्यांना उपयक्त ु ठरावी अशी मांडणी पसु ्तकात करण्याचा प्रयत्न झाला आहे. सकाळ प्रकाशनाने यापर्वी ू च्या पसु ्तकांप्रमाणेच हे पसु ्तकही उत्तम निर्मि‍तीमलू ्यांसह साकारलं आहे. या पसु ्तकात ज्या कालखडं ातील जागतिक घडामोडींचा वेध घेतला आहे, तो जगाच्या वाटचालीतील एक अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. एका बाजल ू ा प्रचडं कुतहू ल वाटावं असा हा काळ आहे, दसु रीकडं दिसणारी सवयीची घडी विस्कटते आहे, अनेक नवी आव्हानं उभी राहताहेत असा अस्वस्थतेचाही काळ आहे. या काळाची तल महायद्धा ु नाच करायची, तर दसऱ्या ु च्या आधी जग जशी ु अस्वस्थता अनभु वत होतं काहीशी तशीच; पण कालानरू ु प बदल असणारं वळण यात दिसतं आहे. शीतयद्ध ु संपताना 80च्या दशकाचा शेवटचा काळ आणि 90च्या दशकाची सरुु वात यावेळच्या अस्वस्थतेची आठवण व्हावी असाही हा काळ आहे. एक परि‍चयाची व्यवस्था बदलते आहे. जगाच्या व्यवहारात एकच एक व्यवस्था कायम कधीच राहत नाही, काही अभ्यासक त्याकडं ग्रेट गेमच्या नजरे तनू पाहतात. जो त्या त्या काळातील बलदडं सत्तांमध्ये चालत आला आहे आणि त्या सत्तांचे निर्णय, धोरणं याचा परिणाम उरलेल्या जगाला भोगावाच लागतो. कधी हा संघर्ष यरु ोपियन सत्तांमध्येच होता, कधी ब्रिटन आणि रशियाच्या साम्राज्यात होता, तर दसऱ्या महायद्धा ु नंतर तो स्पष्टपणे ु अमेरिका आणि सोव्हिएत संघात वाटलेल्या जगात साकारला. शीतयद्धा ु च्या समाप्तीनंतर अमेरिका ही एकच महासत्ता उरली, तिला आव्हान देणारा सोव्हिएत सघं कोलमडला, त्यातनू अनेक नवी राष्ट्रं साकारली. पर्वू यरु ोप आणि पश्चि‍म यरु ोपातील कृ त्रिम फाळणी सपं ष्टा ु त आली. जर्मनीचं एकत्रीकरण झालं. या अस्वस्थपर्व : वेध जागतिक घडामोडींचा | 9

घडामोडी नव्या यगु ाची द्वाही फि‍रवणाऱ्या होत्या. ते यगु अमेरिके च्या वर्चस्वाचं होतं. जगाच्या व्यवहारात अमेरिके ला आणि म्हणनू अमेरिके च्या मित्रराष्ट्रांना रोखणारं कोणी नाही असा हा काळ होता. अमेरिके ने जगाच्या फौजदारीची भमि ू का घेतली होती त्यापायी कधी, कुठंही लष्करी कारवाई करताना अमेरिके ला कोणाच्या इच्छे ची पत्रास बाळगायचं कारण उरलं नव्हतं. अमेरिके च्या पवित्र्यावर शिक्कामोर्तब करत राहणं एवढंच सयं क्त ु राष्ट्रांसारख्या जागति‍क सघं टनांच्या हाती उरलं होतं; मात्र हा काळ लष्करी वर्चस्वापेक्षा अधिक आर्थिक वर्चस्वाचा होता. जागति‍कीकरणाचा बोलबाला याच काळात सरू ु झाला. व्यापार खल ु ा असला पाहिजे, त्यात कमीत कमी बंधनं असावीत. भांडवल, कौशल्य आणि श्रमाचं मक्त ु वहन होईल, तितकी अधिक सबु त्ता जगात येईल, त्याची फळं सर्वांनाच मिळतील, हा जागतिकीकरणाचा मत्रं होता. तो पाश्चात्त्य भांडवलदारांच्या निदान तेव्हा तरी हिताचा होता. यासाठीच अमेरिकी भांडवलदारांनी चीनला जागतिक रचनेत सहभागी करून घ्यावं यासाठी अमेरिके च्या अध्यक्षांना भाग पाडलं. पाश्चात्त्यांना मक्त ु भांडवल आणि चीनसारख्या देशातील स्वस्त मनष्य ु बळ, लवचिक कायदे, यांतनू स्वस्त होऊ शकणारी उत्पादनं, त्याचा उपभोग घेणार पनु ्हा पाश्चात्त्य ग्राहक, यातनू उभयपक्षी लाभाची व्यवस्था साकारते आहे, असा समज या काळात होता. जागति‍क व्यापार संघटनेच्या पढु ाकारानं मक्त ु व्यापाराचे नियम ठरवणं आणि जगाला अधिकाधिक बंधनमक्त ु व्यवहारांकडं नेण,ं हे त्या काळाचं वैशिष्ट्य. साहजि‍कच त्या काळातील साऱ्या व्यापारी वाटाघाटीचं सत्रू देशांनी आयातकर कमी करावा, परकी उत्पादनांना मक्त ु वाव द्यावा यावरच होतं. या विचारांचा पगडा इतका होता, की आता जगाला एका चिरस्थायी व्यवस्थेचं मॉडेल सापडलं आहे, ते जागतिकीकरणावर आधारलेलं आणि उदारमतवादी लोकशाहीचं असेल, असं सांगि‍तलं जात होतं. जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पादन) वर आधारलेल्या प्रगतीसाठीची धोरणं राबवताना जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग सर्वांना व्हावंच लागेल, त्यातनू येणारी समृद्धी त्या त्या देशात अधिक मोकळे पणा आणेल, ही वाटचाल उदारमतवादी लोकशाही बळकट करणारी ठरे ल, इतकंच नव्हे तर लोक जगाच्या व्यवहारात इतके सामावले जातील, की ते जागतिक नागरि‍क म्हणवणं पसंत करतील, त्यातनू राष्ट्र-राज्य संकल्पनेतील सीमारे षाही धसू र व्हायला लागतील, असा तो सारा आदर्शवाद होता. तीस वर्षांच्या वाटचालीनंतर त्यातील अनेक गृहीतकांच्या फुग्याला टाचणी लावणारं वळण 10 | अस्वस्थपर्व : वेध जागतिक घडामोडींचा

जागतिक व्यवहारात आलं आहे. हे पसु ्तक असं का आणि कसं घडत गेलं, या प्रश्नाचा शोध घेत जागति‍क घडामोडींचा आढावा घेतं. शीतयद्धा ु नंतर साकारलेल्या जागतिक रचनेत अमेरिके चा सर्वंकष वरचष्मा स्पष्ट होता. तीस वर्षांनंतर त्याला ग्रहण लागल्याचं चित्र दिसतं आहे. अमेरिका हीच जगातील सर्वांत समर्थ अशी लष्करी आणि आर्थिक ताकद असली तरी अमेरिके चा तो रुबाब, ते स्थान उरलेलं नाही. जागतिकीकरणाच्या रे ट्यात सार्वभौमत्वाच्या संकल्पना पातळ होतील, हे गृहीतक उलटंपालटं होऊ लागलं आहे. या वळणावर भमि‍ ू आधारित राष्ट्रवाद बळकट होताना दिसतो आहे. जीडीपी आधारावरील प्रगती अखडं पणे चालत राहील, याचाही फे रविचार करायची वेळ आणली आहे. या प्रकारच्या मक्त ु अर्थरचनेच्या मॉडेलमधनू येणारी सबु त्ता झिरपत खाली जाईल आणि सर्वांनाच त्याचा लाभ मिळे ल, या गृहीतकातील फोलपणाही समोर येतो आहे. तीस वर्षांत संपत्तीनिर्मितीचं प्रमाण प्रचडं वाढलं; मात्र सपं त्ती मठू भरांच्या हाती एकवटण्याचं प्रमाणही अधिक गतीनं वाढलं. यातनू तयार झालेल्या विषमतेच्या दऱ्या एक खदखद पोसत होत्या. ती खदखद ब्रिटनमध्ये ब्रेक्झि‍टच्या रूपानं बाहेर पडली. अमेरिके त आपला फायदा घेऊन जग प्रगती करतं, आपल्या मल ु ाबाळांना मिळायला हव्यात त्या नोकऱ्या च‍िनी, भारतीय आणि अन्य देशांत पळवल्या जातात या भावनेनं ग्रासलेल्यांच्या मनातलं भय गडद करत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखं नेततृ ्व यशस्वी झालं. जग अधिक लोकशाहीवादी, अधिक उदारमतवादी होईल असं वाटत असताना, जगभरात उजवीकडं झक ु लेल्या नेत्यांची सरशी होताना दिसायला लागली. ध्रुवीकरण हा मत्रं बनू लागला आणि अशा राजकारणात नेहमीच कोणीतरी खलनायक लागतो. तो कधी एखादा देश, कधी एखादा धर्म, तर कधी एखादा वर्ग - समहू दाखवनू ध्रुवीकरण साधायचं आणि तमु च्या समस्यांना अन्य कोणीतरी जबाबदार आहे आणि त्या संपवायच्या तर या जबाबदार असलेल्यांना जमि‍नीवर आणण्यासाठी कणखर नेततृ ्व हवं. हे नॅरेटिव्ह जगभर खपवलं जायला लागलं. कणखरपणाची जाहिरातबाजी करत सत्तेवर आलेल्या नेत्यांचं पीक जगातील अनेक देशांत अचानक आलेलं नाही. द्वेषाच्या राजकारणाला एकाच वेळी जगभरात बळ मिळतं आहे, हे अचानक घडत नाही. साचत चाललेली विषमता, बाजल ू ा पडत असल्याची भावना, यातनू सैरभैर झालेला वर्ग आपल्या समस्यांवर सोपे उपाय शोधतो. त्यातनू ही जग अस्वस्थतेच्या वळणावर आलं अस्वस्थपर्व : वेध जागतिक घडामोडींचा | 11

आहे. मागच्या चार-पाच वर्षांतील जागति‍क घडामोडींत, राजकारणात या साऱ्याचं प्रतिबिंब दिसेल. यातनू शीतयद्धा ु नंतर स्थिर झालेली व्यवस्था बदलते आहे. या बदलाचे संकेत 2008च्या सबप्राइम संकटानंतरच्या जागतिक मदं ीनं दिले होते. त्याही आधी डॉटकॉम बबल फुटण्यानंही या व्यवस्थेत सारं आलबेल नाही हे दाखवलं होतं; मात्र मलमपट्ट्या करून, प्रचडं पैसा ओतनू आहे ती व्यवस्था टिकवण्याचे प्रयत्न के ले गेले. ती टिकल्यासारखी वाटली तरी या व्यवस्थेला आतनू धक्के बसत होते. तसंच या व्यवस्थेला पर्याय देऊ पाहणारा एक भिडू मैदानात उतरत होता तो म्हणजे चीन. शीतयद्धा ु नंतरच्या अमेरिकी डावपेचांचा सर्वाधिक लाभ चीनलाच झाला. चीनची अर्थव्यवस्था सधु ारली, ती जगावर प्रभाव टाकण्याइतपत सक्षम बनली, यात अमेरिकादी पाश्चात्त्यांचा वाटा निर्विवाद आहे. चीन समृद्ध व्हावा, त्याचा लाभ आपल्यालाही व्हावा, किंबहुना चीनची प्रगती आपल्यासाठी अधिक समृद्धी आणेल हे पाश्चात्त्यांचं धोरण होतं. ते फसलं, हे दिसणारा काळ हाच आहे. या चीनच्या जागतिक मश ु ाफिरीसाठी सर्वतोपरी मदत करणारं अमेरिकी नेततृ ्व, त्याची भलामण करणारे बद्धि‍व ु ादी आणि त्याला आधार परु वणारे मतु ्सद्दी यांची फसगत झाली, हे अलीकडच्या अमेरिकी भमि ू कांतनू , धोरणांतनू दिसतं आहे. अनेक अमेरिकी मतु ्सदद् ू के ल्याचं ् यांनी अमेरिके ने चक मान्यही के लं आहे. आर्थिक आघाडीवर सक्षम बनल्यानंतर मळ ु ातच 'मिडल किंगडम सिंड्रोम'नं ग्रासलेला चीन आता आपली वेळ आली आहे असं मानू लागला. डेंग यांनी चीनमधील व्यवस्था अधिक विकासाभिमख ु करण्याला सरू ु वात के ली तेव्हा चीनचं धोरण प्रगती करत राहा पण त्याचा गाजावाजा करू नका, अशाच प्रकारचं होतं. एका टप्प्यावर शी जिनपिगं यांनी चीनची सत्रंू हाती घेतली आणि आता जगाच्या आखाड्यात दडं थोपटून उभं राहण्याची वेळ आली आहे, हे दाखवायला सरुु वात के ली. शी यांना केवळ विकसित चीन हवा आहे असं नाही, तर त्यांना चि‍नी क्रांतीच्या शताब्दीवेळी म्हणजे 2049मध्ये जगातील सर्वांत ताकदवान लष्कर बनवायचं आहे. आर्थिकदृष्ट्या जगावर प्रभाव तर चीनने टाकलाच आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाची दखल घ्यायला, त्याचे व्यूहात्मक परिणाम समजनू प्रतिसाद द्यायलाही जगाला खपू च वेळ लागला. सोव्हिएत सघं ाहून खपू खोलवर चीन जगाच्या अर्थव्यवस्थेत घसु ला आहे. म्हणनू च चीनशी स्पर्धा - सघं र्ष सोव्हि‍एत यनि ु यनइतका सोपा नाही, तो 12 | अस्वस्थपर्व : वेध जागतिक घडामोडींचा

गंतु ागंतु ीचा आहे. शी जिनपिंग यांना आर्थिक लष्करी प्रभावापलीकडं चि‍नी पद्धतीचा समाजवाद हेच जगासाठी मॉडेल असल्याचं वाटतं. त्याची निर्यात करायची तयारी चीन करतो आहे. हे स्पष्टपणे उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेसमोरचं आव्हान आहे. समृद्ध चीन अधिक मोकळा होईल, अधिक लोकशाहीवादी होईल, हे जागतिकीकरणात चीनला सहभागी करून घेताना समोर असेललं गृहीतक परु तं फसल्याचं निदर्शक आहे. चीनच नव्हे, तर अनेक देशांना, तिथल्या एकाधिकारशाहीवादी नेत्यांना उदारमतवादी लोकशाहीच्या मॉडेलचं फार कौतक ु नाही. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पतु ीन यांनी तर जाहीरपणे हे मॉडेल कालबाह्य असल्याचं सांगितलं आहे. हगं ेरीचे व्हिक्टर ओर्बन जाहीरपणे आपल्या देशात अनदु ार लोकशाही अपेक्षित असल्याचं सांगतात. हे असं जाहीरपणे न सांगताही वंश, धर्म आदी बाबींवर आधारलेला बहुसंख्याकवाद जगाच्या अनेक भागांत बोकाळतो आहे. जर्मनीसारख्या देशात उजवे पनु ्हा डोकं वर काढू पाहतात. हे सारं जगाच्या व्यवहारात आलेल्या अस्वस्थतेत भर टाकणारं आहे. याला पनु ्हा तंत्रज्ञानाचा एक आयाम आहे. इटं रनेटवर स्वार झालेले तंत्रज्ञानातील बदल जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांना भिडताहेत, तसंच ते देशादेशांमधल्या व्यवहारांवरही परिणाम घडवताहेत. कदाचित भविष्यातील संघर्ष - यद्धं ु तंत्रज्ञानातील प्रगतीवर ठरतील. कधीकाळी चीन आणि तत्कालीन सोव्हिएत संघातील भमू ीवर काय चाललं आहे हे पाहण्यासाठी अमेरिके ला पाकिस्तानच्या पेशावरच्या तळावरून हलकी विमानं पाठवनू जमेल तितकी माहिती गोळा करण,ं हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वाटत होता. आता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसनू अशी प्राथमिक माहिती जमवणं शक्य आहे. हे तंत्रज्ञानानं घडवंल आहे. बहुतांश यंत्रणा तंत्रज्ञानावर चालतात म्हणनू त्यात तांत्रिक घसु खोरी करायलाही वाव ठेवतात. म्हणनू प्रत्यक्ष रणभमू ीवर न जाताही प्रतिस्पर्ध्याला साऱ्या यंत्रणा ठप्प करून घायाळ करता येईल अशा प्रकारचं हॅकिंगचं तंत्र, पाळतीचं तंत्र विकसित होत आहे. ते पनु ्हा जगासमोर नवी आव्हानं उभी करणारं आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीत अजनू ही अमेरिका हीच आघाडीची महासत्ता असली तरी चीन वेगानं यातील दरी सांधतो आहे, इतर देशही त्यात प्रगती करताहेत. अल्गोरिदम, आर्टिफिशयल इटं ेलिजन्स, रोबोटिक्स, नॅनो तंत्रज्ञान आणि डेटा सायन्स ही भविष्यातली वर्चस्वाच्या लढाईची हत्यारं अस्वस्थपर्व : वेध जागतिक घडामोडींचा | 13

बनतील असंच या वळणावरचं वातावरण आहे. यातील स्पर्धाही नवे ताण निर्माण करणारी, म्हणनू जग ज्या अस्वस्थ वळणावर आहे त्यात भर टाकणारी आहे. सर्वशक्तीमान वाटणारी अमेरिका ट्रम्प यांच्या कारकीर्दीत जगाच्या व्यवहारातनू बाजल ू ा व्हायचा प्रयत्न करताना दिसू लागली. टीपीपीसारख्या करारातनू बाहेर पडण,ं जागतिक हवामान बदलविषयक करारातनू बाहेर पडण,ं इतकंच काय नाटो सदस्यांना आता संरक्षणासाठी अधिक खर्चाची तयारी ठेवा अशी तंबी द्यायला लागण,ं हे सारं याच वाटचालीचं निदर्शक होतं. ट्रम्प यांची बेभरवशाची कारकीर्द संपनू ज्यो बायडेन यांची अध्यक्षीय कारकीर्द अमेरिके त सरू ु झाली आहे, अशा टप्प्यावर हे पसु ्तक येतं आहे. हा सत्ताबदल महत्त्वाचा असला तरी अमेरिका पर्वीस ू ारखी जागतिक व्यवहारात गंतु ायला तयार नाही, किंबहुना त्यासाठी खिशाला खार लावायला उत्सुक नाही हे सत्रू कायम आहे. म्हणनू च अफगाणिस्तानातनू फौजा बाहेर काढताना अगदी अपमानास्पदरीत्या बाहेर जावं लागलं तरी ते अमेरिके ने स्वीकारलं. हा अमेरिकी धोरणातला बदल आणि चीनचा आक्रमक विस्तारवाद याचाही परिणाम जगाच्या वाटचालीवर होतो आहे. चीनने सामर्थ्य कमावेल तसं आपलं प्रभावक्षेत्र वाढवायचं धोरण स्वीकारलं आहे. दक्षिण चि‍नी समद्रा ु तील दादागिरी अत्यंत उघड आहे, ती करताना कोणत्याही जागतिक व्यवस्थेची पत्रास चीन बाळगत नाही. हा नवा चीन भारताच्या दारातही आव्हान म्हणनू उभा आहे. लडाखमधील गलवानच्या खोऱ्यात घसु खोरीनं चीनचे आक्रमक इरादे स्पष्ट झाले आहेत. 1962च्या यद्धा ु नंतर प्रथमच चि‍नी सैन्य हिसं करीतीनं भारतीय भमू ीत येऊ पहात होतं. यातनू चीनला आशियात आपणच ताकदवान आहोत असा सदं श े द्यायचा आहे. पडि ं त नेहरूं नी नेमका हा अहगं ंड हेच 1962च्या यद्धा ु चं कारण असल्याचं एका मल ु ाखतीत म्हटलं होतं. सहा दशकांत चीनच्या मळ ू भमि ू के त काही बदल झालेला नाही, तसाच आपल्या बाजनू े नेत्यांचं स्वागत, गळाभेटी यांतनू परराष्ट्र संबंधांतील ऊर्जा तोलण्याचा भाबडेपणाही संपलेला नाही, हेही या संघर्षातनू दिसलं. चीनला शांततेचं काही पडलेलं नाही. आशियात आपलं निर्विवाद वर्चस्व असलं पाहिजे, त्यानंतर दयु ्यम स्थान भारताने स्वीकारावं, हाच चिनी रणनीतीचा भाग आहे. 1959 मध्ये चि‍नी पतं प्रधान झाऊ एन लाय यांनी दिलेल्या प्रस्तावातील नकाशात तडजोडीची त्यांची तयारी नाही. काळानसु ार मागे-पढु ं 14 | अस्वस्थपर्व : वेध जागतिक घडामोडींचा

व्हायच;ं पण अति ं म लक्ष्य निश्च‍ित आहे. हीच चीनची वाटचाल आहे आणि त्याला तोंड देणं हे भारतापढु चं आव्हान आहे. खासकरून पाकिस्तान चीनच्या अत्यंत निकट जात असल्याच्या पार्श्वभमू ीवर हे आव्हान सरु क्षेच्या आघाडीवर आहे, तसंच राजाननु याच्या आघाडीवरही आहे. दक्षिण चीन समद्रु आणि भारताच्या सीमेलगतच नाही, तर भतू ानसारख्या चिमक ु ल्या देशालाही चि‍नी जमि‍नीची सल ु ड्यावरून दटावतो तेव्हा चीनचं आव्हान ं ग्नताही नसलेल्या तक जगासमोरच उभं राहिलेल असतं. या स्थितीत सरु क्षेची तजवीज करताना अन्य देशांचं सहकार्य मोलाचं ठरतं. इथं भारतीय नेततृ ्वाला अमेरिके च्या किती जवळ जायचं हे ठरवायचं आहे. व्यूहात्मक स्वायत्तता हे भारतीय धोरणाचं दीर्घकालीन वैशिष्ट्य आहे. त्यापलीकडं सरु क्षेसाठीच्या आघाड्यात सहभागी व्हायंच का याच फै सला सोपा नाही. क्वाडसारखा अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलियासोबतचा चतष्को ु न या पार्श्वभमू ीवर बळकट होतो आहे. त्याचं स्वरूप लष्करी नसलं तरी रोख चीनकडं असेल हे स्पष्ट आहे. अमेरिके ने ऑस्ट्रेलियाला अणइु धं नावर आधारि‍त पाणबडु ् या देण्याचा करार ब्रिटनसोबत करून इडं ोपॅसिफिक क्षेत्रातील रणनीती स्पष्ट के ली आहे. यातनू इडं ो-पॅसिफिक हे सागरी स्पर्धाक्षेत्र होण्याची चिन्हं आहेत या घडामोडीही भविष्यातील जागतिक ध्रुवीकरणाची दिशा दाखवणाऱ्या आहेत. अस्वस्थतेचे असे अनेक पदर हे पसु ्तक ज्या काळातील घडामोडींवर आधारि‍त आहे त्याला आहेत. भारतासाठी हा काळ आव्हानांचा तसाच संधींचाही आहे. पंतप्रधान नरें द्र मोदी यांनी सत्रंू हाती घेतल्यानंतर लगेचच आपलं परराष्ट्र धोरणात खास लक्ष असेल असा इरादा दाखवला होता. भारताला जगाच्या व्यासपीठांवर सन्मानाचं स्थान देण्यापासनू दहशतवादाविरोधात जगाला एकत्र आणणं आणि अगदी भारताने जगाला मार्गदर्शकाच्या भमि ू के त विश्वगरू ु म्हणनू स्थान मिळवावं इथपर्यंतचे मनसबु े मोदी यांच्या परराष्ट्र धोरणविषयक कार्यक्रमपत्रिके त असल्याचं सांगितलं जात होतं. जगाच्या व्यवहारात खरंच प्रभाव टाकायचा तर कायम काठावर थांबता येत नाही. प्रसंगी तोशीस सहनही करावी लागते. यातलं काहीच न करता उपदेश करत राहण्याला, केवळ हितसंबंध हाच प्राधन्याचा मामला असलेल्या आतं रराष्ट्रीय राजनयात कोणी फार किंमत देत नाही. अफगाणिस्तानात भारताची चितं ा बेदखल करत जगानं तलिबानकडं अफगाणिस्तानची सत्रंू सोपवण्याचा मार्ग निवडला एवढं अस्वस्थपर्व : वेध जागतिक घडामोडींचा | 15

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.