कार्यअहवाल Flipbook PDF

कार्यअहवाल

19 downloads 109 Views 103MB Size

Recommend Stories


Porque. PDF Created with deskpdf PDF Writer - Trial ::
Porque tu hogar empieza desde adentro. www.avilainteriores.com PDF Created with deskPDF PDF Writer - Trial :: http://www.docudesk.com Avila Interi

EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF
Get Instant Access to eBook Empresas Headhunters Chile PDF at Our Huge Library EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF ==> Download: EMPRESAS HEADHUNTERS CHIL

Story Transcript

अनिल पांडुरंग भगत अध्यक्ष : न्हावा यार्ड कामगार सं घटना सं चालक : जनार्द न भगत शिक्षण प्रसारक मं डळ सं चालक : रामशेठ ठाकू र सामाजिक विकास मं डळ

नगरसेवक : २०११ - २०१६-२०२१ सभापती : २०११ - २०१६

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाले ल्या या भूमीत जन्म घेण्यासाठीही भाग्य लागतं आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समझेन की या भूमीत मी फक्त जन्मच घेतला नाही, तर आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या भूमीची आणि येथील लोकांची सेवा करतोय. मुंबई नगरी चा दरवाजा म्हणून ओळखलं जाणाऱ्या पनवेल या शहराला सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृ तिक आणि क्रांतिकारी चळवळीचा वारसा लाभले ला आहे आणि अश्या शहरात नगरसेवक म्हणून सेवा करणं हे माझं भाग्य आहे. पनवेल शहराचा आज एवढा विकास झाला आहे की आज या शहराला महानगरपालिके च स्वरूप लाभलं आहे. पनवेल शहराचा नगरपालिके मधून महानगरपालिके पर्यंत पोहचण्याच्या हा प्रवास मी कु ठे तरी जवळून पाहिला आहे आणि या प्रवासात मलाही योगदान देता आलं , याचा मला आनंद आहे. २०११ साली झाले ल्या निवडणुकीत लोकनेते सन्माननीय श्री.रामशेठ ठाकू र यांच्या आशीर्वादाने आणि लोकप्रिय आमदार श्री.प्रशांत ठाकू र यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अर्थातच जनतेच्या पाठिं ब्यामुळे मी निवडून आलो आणि त्यांनतर जनतेने त्यांचा माझ्यावर असले ला विश्वास आज पर्यंत कधीच कमी होऊ दिला नाही. माझ्यावर पक्षाने टाकले ल्या जबाबदारीला योग्य रित्या न्याय देण्याचा प्रयन्त मी नेहमी करत असतो. त्यामुळे च कि काय पक्षाने माझ्यावर अनेक मोठ-मोठ्या जबाबदाऱ्या हि टाकल्या. मग ते पालिके तील गटनेत पद असो किं वा पाणीपुरवठा सभापती पद प्रत्येक भूमिके तून मी माझ्यावर असले ल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न के ला आहे. तसेच गेली वीस वर्षे मी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचा संचालक म्हणून काम पाहतोय. ह्या मोठ-मोठ्या जबाबदाऱ्या पेलवण्या इतपत मी योग्य आहे, असं माझ्या पक्षाला आणि जनतेला वाटणं हेच माझ्या मेहनतीचं फळ आहे.

या पनवेल शहराची जनता पुढेही मला त्यांची सेवा करण्याची संधी देईल, अशी अपेक्षा करतो आणि हे कार्यअहवाल आपल्या सर्वांच्या स्वाधीन करतो.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या साठी जे के ले आहे, त्याची परतपेढ आपल्या कु णाकडूनच होणं शक्य नाहीये. आपल्या हातात फक्त एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आणि ते समस्त हिंदू लोकांसाठी काय करून गेले आहेत हे येणाऱ्या पुढच्या हजारो पिढयांना सांगणं, त्यांचा इतिहास व आपली संस्कृ ती लोकांपर्यंत पोहचवण आणि जतन करणं.

पनवेल शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणातून एक छोटीशी शिवसृष्टी उभारण्याचा प्रयत्न आम्ही के ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा सुशोभीकरण सोहळा पार पाडताना खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्री. प्रशांत ठाकू र, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते.

प्रभाग क्रमांक

१९

महापौर कविता चौतमल, सभागृह नेते श्री.परेश ठाकू र यांच्या सोबत महानगरपालिके च्या कामांचे उदघाटन आणि भूमिपूजन करताना.

प्रभाग क्रमांक

१९

कोरोनाच्या संकट काळात दिवसेंदिवस वेगवेगळ्या समस्या समोर येत होत्या. त्यातच रुग्णांना अत्यावश्यक रक्ताचा सुध्दा दिवसेंदिवस तुडवडा वाढत होता. याचीच जाणीव मनाशी बाळगून भारतीय जनता पार्टी तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल) यांच्या जयंती निमित्त सी.के .टी महाविद्यालय खांदा कॅालनी, सुषमा पाटील विद्यालय कामोठे आणि रामशेठ ठाकू र पब्लिक स्कू ल खारघर येथे ''रक्तदान शिबीर'' आयोजित करण्यात आले होते.

प्रभाग क्रमांक

१९

सिडको येथे पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील पाणी टंचाई व पाणी पुरवठ्याच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी आमदार श्री.प्रशांत दादा ठाकू र यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. सिडकोकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा आजपर्यंत सिडकोने तोडगा काढलेला नव्हता. यासाठीचे निवेदन सिडको सहव्यस्थापकीय संचालक डॉ. कै लास शिंदे यांना देण्यात आले. यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल तसेच सभापती, नगरसेवक उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक

१९

प्रत्येक प्रगत राष्ट्राचा पाया शिक्षण आहे, हे ओळखून माननीय रामशेठ ठाकू र साहेब यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना के ली आणि आज या संस्थेच्या मार्फ त शिक्षण गावोगावी पोहचत आहे. आज जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचं नाव हे नावाजलेल्या शिक्षण संस्थेमध्ये येतं आणि अश्या संस्थेचा संचालक म्हणून कार्यभार पाहताना मला अतिशय आनंद होतो. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकू र स्वायत्त महाविद्यालयात पदवीधर विद्याथ्यांना पदवी वाटप करताना ची एक आठवण.

प्रभाग क्रमांक

१९

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने पनवेल शहरात तिरंगा सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत लहान थोर सारेच उत्साहात सहभागी झाले होते.

प्रभाग क्रमांक

१९

वीज पुरवठा समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी सभागृह नेते श्री.परेश ठाकू र यांच्या सोबत विद्युत वितरण कं पनी मध्ये भेट दिली. पाहणी अखेरीस संबंधित अधिकाऱ्यांना सूचना हि करण्यात आल्या.

प्रभाग क्रमांक

१९

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने मार्फ त प्रभाग क्र. १९ मध्ये मोफत धान्य वाटप करण्यात आले.

प्रभाग क्रमांक

१९

पनवेल महानगरपालिके च्या महापौर कविता चौतमोल, सभागृहनेते श्री.परेश ठाकू र आणि इतर नगरसेवक पनवेल मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करताना.

पनवेल शहरातील जुन्या पोस्ट ऑफिसजवळ सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण कें द्र सुरु करण्यात आले होते. त्याचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते, त्या क्षणाचे छायाचित्र.

प्रभाग क्रमांक

१९

संकट समयी जो नेता जनतेसोबत उभा राहून त्यांची मदत करत असतो,तोच खरा नेता. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा आप्त स्वकीयांनी ही आपली साथ सोडली होती, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गरजूंना मदत करून समाजा प्रति असलेले त्यांचे कर्तव्य पार पाडले. कोरोना काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले गेले, त्यातील एक उपक्रम म्हणजे मोफत लसीकरण उपक्रम.

प्रभाग क्रमांक

१९

कामोठे येथे फू ड बास्के ट या सुपरमार्के टचा उदघाटन सोहळा पार पडला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी व उदघाटनानिमित्त दिलेली भेट.

प्रभाग क्रमांक

१९

पनवेल कोळीवाडा येथील मच्छी मार्के ट ची अवस्था खराब असल्यामुळे कोळी बांधवांशी बोलताना व मच्छी मार्के ट ची पाहणी करताना पनवेल महानगरपालिके चे आयुक्त सुधाकर देशमुख, शहर अभियंता संजय कटेकर,सभागृह नेते परेश ठाकू र व नगरसेवक अनिल भगत. पाहणी नंतर मच्छी मार्के टच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली.

प्रभाग क्रमांक

१९

कोशिश फौंडेशन च्या वतीने आयोजित, बाप्पा मोरया घरघुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेतील एकू ण विजेत्यांना २५ हजार रुपयांची बक्षीशे देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी सभागृह नेते श्री.परेश ठाकू र, नगरसेविका रुचिता लोंढे व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक

१९

पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र. १९ मधील पंचरत्न हॉटेल, रोहिदास वाडा, टपालनाका भागाची पाहणी सभागृह नेते परेश ठाकू र यांच्या उपस्थितीत पालिका अधिकाऱ्यांसोबत करण्यात आली. यावेळी तुटलेल्या गटारावरील झाकणे, रस्त्यावरील खड्डे, कचऱ्याची समस्या अश्या विविध नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल लवकरात लवकर उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

प्रभाग क्रमांक

१९

प्रवाशांना ऊन आणि पावसापासून वाचता यावं यासाठी नगरसेवक निधीतून पंचरत्न हॉटेल जवळ बस थांबा बनवण्यात आले.

प्रभाग क्रमांक

१९

सौ. तृप्ती सांडभोर अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका यांच्या बरोबर मच्छी मार्के ट आणि सभोवतालच्या परिसराची पाहणी करताना.

प्रभाग क्रमांक

१९

वडाळे तलाव सुशोभीकरणाची अखेरच्या टप्य्याची पाहणी करताना.

प्रभाग क्रमांक

१९

पनवेलच्या ‘दिवाळी पहाट’ मध्ये सप्तसुरांची उधळण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार श्री.प्रशांत ठाकू र आणि पनवेल महापालिके चे सभागृह नेते श्री.परेश ठाकू र यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रम शहरातील नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या वडाळे तलावाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या वेळी सात्विक, आल्हाददायी व मनमोहक वातावरणात राहुल देशपांडे यांनी सप्तसुरांची उधळण के ली त्याचा पनवेलकरांनी आस्वाद घेतला.

प्रभाग क्रमांक

१९

संकट काळात गरजू लोकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्याचे पालन मी कोरोना काळात ही के लं.

(कोरोना काळात रोहिदास वाडा येथे गरजू लोकांना धान्य वाटप करताना.)

प्रभाग क्रमांक

१९

कोरोना काळात गरजू लोकांना मोफत मोदी भोजन सेवा देण्यात आली. कोरोनाच्या या बिकट काळात अनेक लोकांना एक वेळेचं जेवण मिळणं कठीण झालं होतं, म्हणूनच आमदार प्रशांत ठाकू र यांनी पंतप्रधान मोदीजींनी सुचवल्या प्रमाणे मोफत मोदी भोजन सेवा जनसामान्यांपर्यंत पोहचवली.

प्रभाग क्रमांक

१९

आवाज भूमीपुत्रांचा...! जन्मभूमी आमची, जागा आमच्या, तिथे काम करायला लोक आमचे, मग तिथे होणाऱ्या प्रकल्पाला आमच्या नेत्याचं नाव का नाही ? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, हि मागणी समझून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांना दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली होती. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून पनवेल शहरात मशाल मोर्चा काढण्यात आला.

प्रभाग क्रमांक

१९

महाड येथे झालेल्या पुरात अनेकांचे घर संसार वाहून गेले. अश्यावेळी माणुसकीचा धर्म हाच सर्वश्रेष्ठ आहे हे माणसाने दाखवून दिले. महाड येथील पुरग्रस्थ बंधू बघिणींना हवी असलेली मदत पूर्ण देश भरातून येत होती. याच वेळी आमचा हि माणूस असल्याचा धर्म आम्ही पार पडला. सोबतच एक लाख रुपयांची आर्थिक मदत हि पुरग्रस्थांना करण्यात आली.

प्रभाग क्रमांक

१९

कोणत्याही पक्षाचा जीव म्हणजे त्या पक्षाचे कार्यकर्ते. त्यांना मार्गदर्शन करत राहणं व प्रोत्साहन देणं हे गरजेचं असतं आणि यात आपला पक्ष आणि आपले नेते कधीही कमी पडत नाही.

भारतीय जनता पार्टीच्या प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना व मान्यवरांना नियुक्ती पत्रक देताना नगरसेवक अनिल भगत.

प्रभाग क्रमांक

१९

कोरोना काळात आपण सगळे घरात बसून आपल्या लोकांसोबत वेळ घालवत होतो. तेव्हा काही असे हि लोक होते, जे घराबाहेर पडून आपल्या शहराला स्वच्छ ठेवत होते. पनवेल महानगरपालिके चे सफाई कर्मचारी रोज आपल्या परिसरात येऊन आपल्या भागातील कचरा संकलन करत होते. कोरोनाच्या सावटात सुद्धा नियमित स्वच्छता ठेवत होते. यासाठीची कृ तज्ञता व्यक्त करता यावी, म्हणून पनवेल महानगरपालिके च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

प्रभाग क्रमांक

१९

स्वच्छतेचं महत्व जाणून माननीय पंतप्रधान मोदी जी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु के लं आणि आज देशभर वेगवेगळ्या स्वच्छता मोहीम राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय स्वछता दिनाचे औचित्य साधून पनवेल मध्ये नगरसेविका रुचिता लोंढे, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांसोबत पनवेल शहराची ची साफ सफाई करून स्वच्छता दिवस साजरा के ला गेला.

प्रभाग क्रमांक

१९

पनवेल कोळीवाडा येथे पेवर ब्लॉक रत्याच्या कामाचे उदघाटन व भूमिपूजन नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रभाग क्रमांक

१९

पनवेल शहरातून जाणाऱ्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. सदर बाब लक्षात आल्याने शहर अभियंता संजय कटेकर यांच्यासोबत सभागृह नेते परेश ठाकू र, पनवेल महानगर पालिके चे अधिकारी साळुंके तसेच टी. आय. पी. एल. कं पनीचे इंजिनियर संतोष कडू व भाजपचे उमेश इनामदार हे सगळे उपस्थित होते. त्यांनतर टी. आय. पी. एल. कं पनी मार्फ त खड्डे बुजवण्याचं काम मोफत के लं गेलं.

प्रभाग क्रमांक

१९

दि. १५/११/२०२१ रोजी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पनवेल शहर व नवीन पनवेल येथील वार्ड क्र. १४ ते २० या वार्ड मध्ये एकू ण रक्कम रु. ४६,९१,९८,२२३/- रुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन आमदार श्री प्रशांत ठाकू र, सभागृह नेते श्री परेश ठाकू र, महापौर कविता चौतमल, उपमहापौर जगदीश गायकवाड, नगरसेवक नितीन पाटील, दर्शना भोईर, रुचिता लोंढे, राजू सोनी, हरेश के नी, बबन मुकादम, मनोज बुजबळ, तेजस कांडपिळे, सुशील घरत, चारुशीला घरत, अजय बहिरा व भारतीय जनता पक्ष शहर अध्यक्ष जयंत पगडे, अमरीश मोकल, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडले.

प्रभाग क्रमांक

१९

माननीय आमदार श्री.प्रशांत दादा ठाकू र यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्ध्यांना मोफत शालेय वस्तू वाटप करण्यात आल्या. त्यावेळी सभागृह नेते श्री.परेश ठाकू र,नगरसेवक नितीन पाटील,अमरीश मोकल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक

१९

पनवेल शहरातील युवानेते के दार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिके ट सामन्यांचे आयोजन के ले होते. तिथे त्यांना वाढदिवसाच्या आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना प्रमुख पाहुणे रामशेठ ठाकू र व नगरसेवक अनिल भगत.

प्रभाग क्रमांक

१९

पनवेल शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी पोलीस अधिकारी, महानगरपालिका अधिकारी आणि व्यापारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापौर, नगरसेवक, महानगरपालिके चे अधिकारी, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकु मार लांडगे, वाहतूक शाखेचे प्रभारी निरीक्षक नाळे, मोबिलिटी सल्लागार क्रिसिल कं पनीचे प्रतिनिधी आणि व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते .

प्रभाग क्रमांक

१९

लॉकडाऊन नंतर बाजारपेठ सुरु झाल्या, पण व्यापाऱ्यांना अजून नवनवीन समस्या उद्भवू लागल्या. बाजारपेठातील छोटे रस्ते, त्यामुळे वाढणारी गर्दी आणि इतर हि बऱ्याच समस्यांवर व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

प्रभाग क्रमांक

१९

सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा

आमदार श्री.प्रशांत दादा ठाकू र, सभागृह नेते श्री.परेश दादा ठाकू र, भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयवंत पगडे यांच्या समवेत पालिकाकर्मचाऱ्यांसोबत स्वतंत्र्य दिन साजरा करताना.

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकू र स्वायत्त महाविद्यालयात २६ जानेवारी निमित्त झेंडावंदन करताना जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक अनिल भगत.

भारतीय जनता पक्षाच्या पनवेल पक्ष कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजरोहण के लं गेलं त्यावेळी पक्षातील सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक

१९

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, पनवेल येथील नंदनवन कॉम्प्लेक्सजवळ पनवेल-कामोठे-कळंबोली प्रवास करणार्‍यांसाठी शेअर रिक्षा थांब्याचे उद्घाटन करण्यात आले. भाजप पनवेल शहर सरचिटणीस व नगरसेवक नितिन पाटील, नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते थांब्याचे उद्घाटन करण्यात आले. पनवेल-कामोठे तसेच कळंबोलीकडील वाढत्या रहदारीमुळे प्रवास करणार्‍या प्रवाशांचे हाल पाहता पनवेल येथे त्यांच्यासाठी एका रिक्षा थांब्याची आवश्यकता होती. याकरिता भारतीय जनता पार्टी पुरस्कृ त, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेने पुढाकार घेऊन हा थांबा उभारला आहे. या वेळी वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक, नगरसेविका दर्शना भोईर, संघटनेच्या सुहासिनी के काणे, नाका प्रमुख अभिलाष डांगरकर, उप नाकाप्रमुख बाळासाहेब भालेकर, सदस्य पोपट ठोंबरे, सुनील भोपी, राजेंद्र पोटे, भूषण सूर्यवंशी, उमेश बाबर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभाग क्रमांक

१९

पनवेल महानगरपालिके च्या तळोजा विभागातील विकास कामांचे भूमिजन पार पाडताना, महापौर कविता चौतमल, आमदार श्री.प्रशांत ठाकू र, सभागृह नेते श्री.परेश ठाकू र व इतर मंडळी.

प्रभाग क्रमांक

१९

कोशिश फाऊं डेशनच्या वतीने पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प के लेला असून या अभियानाची सुरुवात आमदार श्री.प्रशांत दादा ठाकू र यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिना दिवशी करण्यात आली. आत्ता पर्यत ९०० पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. ह्या अभियानास पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांनी भेट देऊन वृक्षारोपण करत शुभेच्छा दिल्या.

प्रभाग क्रमांक

१९

आपली संस्कृ ती जपणं ही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे आणि जर तुम्ही नेते असाल तर तुमचं ते प्रथम कर्तव्य. आमदार श्री प्रशांत ठाकू र गेले कित्येक वर्ष आपली नाटक संस्कृ ती जपण्यासाठी कै . अटल बिहारी वाजपयी यांच्या नावाने पनवेल मध्ये अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा भरवत असतात.

रामशेठ ठाकू र सामाजिक विकास मंडळ पुरस्कृ त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल व चांगु काना ठाकू र स्वायत्त महाविद्यालय आयोजित अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना अनिल भगत

स्पर्धेची पूर्वतयारी प्रभाग क्रमांक

१९

नगरसेविका स्व.मुग्धाताई गुरुनाथ लोंढे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. त्यावेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार श्री.प्रशांत ठाकू र साहेब,भाजपा नेते श्री.नंदूशेठ पटवर्धन, नगरसेविका रुचिता लोंढे, श्री.गुरुनाथ लोंढे आदी मान्यवरसह उपस्थिती होते.

प्रभाग क्रमांक

१९

पनवेल होत आहे प्रगत सोबत आहेत

अनिल पांडुरंग भगत

सोशल मीडिया कनेक्ट Anil Bhagat

@anilbhagatnagarsevak

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2025 MYDOKUMENT.COM - All rights reserved.